Ad will apear here
Next
‘देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले’
पंतप्रधानांचा ‘व्हीसी’द्वारे देशातील कार्यकर्त्यांशी महासंवाद
मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांच्या भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारच्या कार्यकाळात देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले आहे’, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२.३० ते दोन या दीड तासाच्या वेळेत संपूर्ण देशभरातील एक कोटीहून अधिक ‘भाजप’ हितचिंतक व कार्यकर्त्यांशी  ‘प्रधानमंत्री संघटन संवाद’ या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी ‘भाजप’ प्रदेश कार्यालय, नरिमन पॉइंट येथे टिव्ही स्क्रीनवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. या वेळी आमदार व प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर, खासदार विकास महात्मे, ‘भाजप’ प्रदेश माध्यम विभागप्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये, ‘भाजप’ प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी आणि कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZZPBY
Similar Posts
‘मोदी सरकारच्या कामांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यात आला असून, त्याच्या आधारे भारत देश हा विकसित देश होण्याची आणि महाशक्ती बनण्याची आकांक्षा आपण ठेऊ शकतो,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले.
‘२०१९मध्येही भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता’ मुंबई : ‘गेल्या चार वर्षांत देशातील सर्वात गरीब आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केल्याने २०१९मध्ये पुन्हा एकदा भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता स्थापन होईल,’ असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला
‘चंद्रकांत पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजप अधिक मजबूत बनेल’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, त्यांच्या संघटन कौशल्यामुळे सरकार व जनतेमधील संघटनेचा सेतू अधिक मजबूत बनेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
‘नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ‘भाजप’चा विजय संकल्प’ मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार हवे आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्पष्ट बहुमताने पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा विजय संकल्प करून ‘भाजप’चे कार्यकर्ते कामाला लागले आहेत,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language